नवी, मुंबई, 30 ऑगस्ट : नवी मुंबईतील कामोठे परिसरातून चार वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न नागरिकांनी उधळून लावला. याप्रकरणी नागरिकांनी चोरट्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. ही मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक अजय निषाद या व्यक्तीनं मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर तातडीनं आजूबाजू्च्या नागरिकांनी धाव घेत या चोराला चोप दिला.