Kandivali

Kandivali - All Results

Showing of 1 - 14 from 14 results
VIDEO : ...अन् मुख्यमंत्र्यांनी आमदाराकडून खेचला माईक

व्हिडीओDec 25, 2018

VIDEO : ...अन् मुख्यमंत्र्यांनी आमदाराकडून खेचला माईक

मुंबई, 25 डिसेंबर : यापुढे मुख्यमंत्र्यांसमोर कोणतेही मंत्री किंवा नेते वेळखाऊ भाषण ठोकणार नाही. कारण वेळेत कार्यक्रम संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्याच्या हातातला माईक खेचल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मुंबईतील कांदिवलीमधल्या सीएम चषक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार योगेश सागर यांच्या हातातून माईक खेचला. कार्यक्रमादरम्यान आमदार योगेश सागर हे माईकवर बोलत होते. मुख्यमंत्री त्यांच्याकडे माईक सोपवण्यासाठी इशारा करत होते. मात्र, योगेश सागर यांचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. अखेर मी मुख्यमंत्र्यासोबत गृहमंत्रीसुद्धा आहे, त्यामुळं कायदेशीरपणे योग्य वेळेत कार्यक्रम संपवतो, अशी टिप्पणी करत मुख्यमंत्र्यांनी योगेश सागर यांच्या हातातून माईक खेचला.