पत्रकारितेवर आणि मनस्वी पत्रकारांवर मनापासून प्रेम करणारे ज्येष्ठ संपादक सोमनाथ पाटील यांचे निधन हा मराठी पत्रकारितेसाठी फार मोठा धक्का आहे. मराठीत ते सही करताना फक्त "सो.पा." असे दोनच शब्द लिहायचे. आताच्या कठीण काळात असा 'सोपा' माणूस पुन्हा मिळणार नाही.