19 फेब्रुवारी : 'काश्मीर खोऱ्यात जो कोणी हातात शस्त्र घेईल त्याचा खात्मा केला जाणारच', अशा शब्दात भारतीय लष्करानं दहशतवादीविरोधी कारवायांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांना इशारा दिला आहे. त्यामुळं आगामी काळात जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांना पळताभूई थोडी होणार आहे. दहशतवादाच्या मार्गाकडे वळलेल्या मुलांना त्यांच्या मातांनी सुरक्षादलासमोर समर्पण करण्यास सांगावं असं कळकळीचं आवाहनही लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान लष्कराला स्थानिकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. दहशतवाद्यांशी दोन हात करताना लष्कराच्या जवानांना काश्मीर खोऱ्यातल्या स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. मात्र, आता लष्करानं दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला.