Jalna S13p18 Videos in Marathi

VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य

बातम्याApr 2, 2019

VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य

सिद्धार्थ गोदाम, जालना, 2 एप्रिल : भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आपल्या बोलण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत वादात सापडत आहेत. रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. कारण दानवे यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा 'हेलिकॉप्टरचा पायलट' असा उल्लेख केला आहे. वास्तविक अभिनंदन हे भारताच्या फायटर विमानांचे जिगरबाज पायलट आहेत. या नव्या वक्तव्यानंतर दानवे यांच्यावर पुन्हा एकदा टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुलवामाबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले होते की, 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले.' दानवेंच्या या वक्तव्यानंतर त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.