#jalgaon

Showing of 53 - 66 from 189 results
LIVE VIDEO : मृत्यूच्या तावडीतून तरुणाने वाचवलं विवाहितेला!

महाराष्ट्रDec 31, 2018

LIVE VIDEO : मृत्यूच्या तावडीतून तरुणाने वाचवलं विवाहितेला!

इम्तियाज अली, जळगाव, 31 डिसेंबर : रावेर तालुक्यातील धुरखेडा येथील एका 30 वर्षीय विवाहीत महिलेनं तापी नदीवरील निभोंरासीम-प्रिंपीनांदू या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत नदीत उडी घेऊन या महिलेला वाचवलं. धुरखेडा येथील शारदा पांडुरंग धनगर (वय 30) ही महिला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धुरखेडा येथून तापी नदीच्या पुलावर आली आणि थेट पुलावरून नदीत उडी मारली. मात्र, नदीत याठिकाणी पाणी पातळी कमी असल्यानं पुलावरून जाणाऱ्या वाहनधारकांना ही महिला पाण्यावर हात मारतांना दिसून आली. यावेळी, तिथे पोहचलेल्या ज्ञानेश्वर बेलदार या तरुणाने तात्काळ नदीत उडी मारून सदरील महिलेला वाचवलं. सदरील महिलेनं आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी पुलाच्या कठड्यावर लिहून ठेवली, असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं होतं. या महिलेचा सात महिन्यांपूर्वी गावातील एका तरुणाबरोबर सूत जुळले होते. तिने नवऱ्याचं घर सोडून प्रियकरासोबत पलायन केलं होतं. यामुळे वाद उद्भवल्यानं या महिलेनं आत्महत्या करण्याचं पाऊल उचल्याचं सांगितलं जात आहे.