#jalgaon

Showing of 27 - 40 from 127 results
या अपयशातून आत्मचिंतन करणार- सुरेशदादा जैन

बातम्याAug 3, 2018

या अपयशातून आत्मचिंतन करणार- सुरेशदादा जैन

जळगाव महापालिका निवडणुकीत गिरीश महाजनांकडून झालेला पराभव सुरेशदादा जैन यांच्या जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत पहिल्यांदा सुरेशदादा शिवसेनेकडून लढले होते. गेल्या ३५ वर्षांपासून सुरेशदादा बिनविरोध जळगावात जिंकत होते. मात्र यावर्षी त्यांचे शिष्य गिरीश महाजनांकडूनच हार पत्करावी लागली. आपल्या अपयशाबद्दल बोलताना सुरेशदादा म्हणाले की, ‘सगळ्या घटनांचं आत्मचिंतन करणार आहे.’ निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना बाजूला ठेऊन महाजानांनी भाजपचं जळगावात 'कमळ' फुलवून दाखवलंय. जळगाव महापालिकेचा सत्ता काबिज करताना महाजनांनी आपले पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू सुरेशदादा जैन यांनाही जोरदार धक्का देत चांगलाच धोबीपछाड दिलाय.

Live TV

News18 Lokmat
close