कोलंबो, 21 एप्रिल: श्रीलंकेची राजधीनी कोलंबोसह देशभरात बॉम्बस्फोट झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इस्टर संडेच्या दिवशी चर्चवर हल्ला करण्यात आला आहे. आठ जागांवर एकाच वेळी हा स्फोट घडवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू तर 450 जण जखमी झाले आहेत.यामध्ये हॉटेल आणि चर्चला लक्ष्य करण्यात आलं होतं. आयएसआयएसनं हा स्फोट घडवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.