#indore

Showing of 27 - 40 from 83 results
VIDEO : राज्याबाहेरच्या 'या' शहरात उधळतात टँकरभर रंग, ही रंगांची 'मिसाईल' पाहून व्हाल थक्क

बातम्याMar 25, 2019

VIDEO : राज्याबाहेरच्या 'या' शहरात उधळतात टँकरभर रंग, ही रंगांची 'मिसाईल' पाहून व्हाल थक्क

इंदौर, 25 मार्च : महाराष्ट्रात नाशिक, कोल्हापूर आणि थोड्या फार पश्चिम महाराष्ट्राच्या भागात आजही रंगपंचमीची धमाल दिसते. बाकी संपूर्ण उत्तर भारतात आणि आजकाल राज्यातली धुळवडीच्या दिवशीच रंग खेळले जातात. पण पारंपरिक पद्धतीने रंग खेळण्याचा सण म्हणून आजही काही ठिकाणी रंगपंचमी साजरी होते. राज्याबाहेर सर्वांत मोठ्या प्रमाणावर पंचमीच्या दिवशी रंग खेळले जातात मध्य प्रदेशात इंदौरमध्ये. इंदौरच्या मुख्य रस्त्यावरून ही प्रचंड मिरवणूक निघते. संगीताच्या तालावर अक्षरशः मोठ्या पाईपमधून रंग उधळला जातो. रंगपंचमीचं असं मिरवणुकीच्या स्वरूपातलं सेलिब्रेशन पाहिल्यावर अनेकांना महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाची आठवण येईल. टँकरभर रंग उधळण्यासाठी मोठे पाईप वापरतात आणि मशीनच्या साहाय्याने रंगाची उधळण होते. याला तिथे रंगांची 'मिसाईल' असंच म्हणतात.