#indian air force

Showing of 79 - 92 from 162 results
SPECIAL REPORT : पाकला विमान पाठवणे पडले महागात, भारताने असे दिले उत्तर!

बातम्याFeb 27, 2019

SPECIAL REPORT : पाकला विमान पाठवणे पडले महागात, भारताने असे दिले उत्तर!

27 फेब्रुवारी : भारतानं आक्रमक पवित्रा घेतल्यामुळं पाकिस्तानची पुरती भंबेरी उडाली आहे. भारतीय हवाई दलानं थेट पाकिस्तानत घुसून दहशवादी कॅम्प बेचिराख केल्यानंतर पाकिस्तानंच्या लढाऊ विमानांनी आज सकाळी भारतीय हवाई हद्दीत शिकरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा त्यांचा मनसूबा होता. मात्र, डोळ्यात तेल घालून हवाई हद्दीचं रक्षण करणाऱ्या जाँबाज भारतीय हवाई दलाच्या विमानांनी तो प्रयत्न हाणून पाडला. जम्मू- काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं ही आगळीक केली होती. मात्र, त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. पाकिस्तानचं एफ-16 ही विमानं भारताच्या हवाई हद्दीत दाखल होताच भारताच्या लढाऊ विमानांनी त्यांना चोख उत्तर दिलं. त्यामुळं घाबरलेल्या पाकिस्तानी वैमानिकांनी पळ काढला. मात्र, भारताच्या मिग-21 लढाऊ विमानांनी त्यांचा पाठलाग करुन पाकिस्तानचं एक एफ-16 विमान हाणून पाडलं. तसेच जम्मू-कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.