देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी फायदेशीर सेवा सुरू केली आहे. अलीकडेच SBI ने सेव्हिंग्स प्लस अकाउंट (SBI Savings Plus Account) सुरू केले आहे. हे एक मल्टी ऑप्शन डिपॉजिट (MOD) सोबत जोडलेले आहे. यामध्ये एक ठराविक रक्कम असते, त्यापेक्षा जास्त रक्कम जर खात्यात जमा झाली तर ती फिक्स डिपॉझिटमध्ये ट्रांसफर होते.