#imran khan

नसीरुद्दीन शाह यांनी इम्रान खान यांना सुनावले खडे बोल; काय म्हणाले पहा VIDEO

व्हिडिओDec 24, 2018

नसीरुद्दीन शाह यांनी इम्रान खान यांना सुनावले खडे बोल; काय म्हणाले पहा VIDEO

मुंबई, 23 डिसेंबर : भारतातल्या सद्यस्थितीवर भाष्य करताना चित्रपट अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी चिंता व्यक्त केली. नसीरुद्दीन यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टीकास्त्र डागलं. इम्रान यांच्या वक्तव्यामुळे भारताच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली जात असल्याने, नसीरुद्दीन शाह यांनी लागलीच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांना खडेबोल सुनावलेत. ''मिस्टर इमरान खान यांनी त्याच मुद्यावर भाष्य केले पाहिजे, जे त्यांच्या देशाशी संबंधित आहे. ज्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही, त्यावर त्यांनी बोलू नये. मागील ७० वर्षांपासून आमच्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे आमची काळजी कशी घ्यावी, हे आम्हाला चांगलं समजतं'', अशा शब्दात नसीरुद्दीन यांनी इम्रान खान यांना सुनावलं आहे. तर, दोघांच्या या वक्तव्यानंतर आता वाग्युद्धाला सुरूवात झाली आहे. नसीरुद्दीन यांनी इम्रान खान यांना खडेबोल सुनावल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडणार की, आणखी कोणी या वादाच्या ठिणगीला हवा देणार हे पाहावं लागेल.

Live TV

News18 Lokmat
close