Elec-widget

#ibn लोकमत इम्पॅक्ट

Showing of 27 - 27 from 27 results
IBN लोकमत इम्पॅक्ट: कॉमन मॅनचा पुतळा हलवला

बातम्याMay 14, 2012

IBN लोकमत इम्पॅक्ट: कॉमन मॅनचा पुतळा हलवला

14 मेमुंबईमधील वरळी सी फेसचा परिसर सुशिक्षितांचा, श्रीमंतांचा आणि धनिकांचा अधिकार्‍यांचा आणि लोकप्रतिनिधींचा ओळखला जातो. वरळीच्या या सी फेस वर असलेला आर.के. लक्ष्मणांच्या कॉमन मॅनचा पुतळा ही एक एक स्वतंत्र ओळख आहे. पण या कॉमन मॅनचं गेल्या काही दिवसांपासून नाक कापलं गेलं आहे. मात्र, या कॉमन मॅनकडे बघायला मात्र सध्या कुणाचच लक्षं नाही. आयबीएन लोकमतच्या बातमीची दखल घेत पर्यावरण आणि गृहनिर्माण मंत्री सचिन अहिर यांनी पुतळा हलवण्यात आला आहे अशी माहिती दिली आहे. पुतळा दुरुस्त करता येईल का याची चाचपणी केली जाणार आहे आणि जर दुरुस्ती शक्य नसेल तर नवीन पुतळा उभारला जाणार असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.