27 फेब्रुवारी : भारतीय वायू दलाने पाकिस्तान व्याप्त भागात घुसून दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केलं. या मोहिमेत मिराज 2000 या लढाऊ विमानांनी धडाकेबाज कामगिरी बजावली होती. त्यामुळेच अजमेरमध्ये राठोड कुटुंबाने आपल्या नवजात मुलाचे नाव 'मिराज' असं ठेवलं आहे. मंगळवारी भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ला केला, त्याच वेळी या बाळाचा जन्म झाला होता. म्हणून या कुटुंबीयांने बाळाचे नाव मिराज ठेवण्याचा निर्णय घेतला.