#hunting

पाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल

व्हिडिओDec 14, 2018

पाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल

महेश तिवारी, प्रतिनिधी, 14 डिसेंबर : चंद्रपूरच्या ताडोबातील पर्यटकांना आज नवा थरार अनुभवायला मिळाला. सोनम नावाच्या वाघिणीने सांबराची शिकार केली. ताडोबातील एका पाणवठ्यावर सांबरांचा कळप पाणी पिण्यासाठी आला होता. या आलेल्या सांबराच्या कळपावर सोनम वाघिणीनं हल्ला चढवला. पाणवठ्याच्या मधोमध असलेल्या सांबराला लक्ष्य करुन सोनम वाघिणीनं पाण्यात घेतलेली उडी पर्यटकांना स्तब्ध करणारी ठरली. सोनम वाघिणीनं अतिशय चपळतेनं पाण्यातल्या कळपावर हल्ला केला आणि शिकार टिपली. पाणवठ्याजवळ असलेल्या पर्यटकानं हे दृश्य कॅमेराबद्ध केलं असून ते आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

Live TV

News18 Lokmat
close