कोल्हापूर, 17 जानेवारी : खंडपीठाच्या प्रलंबित मागणीसाठी कोल्हापुरातले वकील मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. गेल्या अनेक वर्षांपासून उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं अशी मागणी कोल्हापुरातील वकिलांनी लावून धरली आहे. मात्र, ती प्रत्यक्षात न उतरल्यानं वकीलांसोबतच पक्षकारही आज (17 जाने.) रस्त्यावर उतरले होते. कोल्हापूर शहरातील न्यायसंकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही झाले सहभागी होते. यावेळी खंडपीठासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.