मुंबई, 27 जून : आरक्षणासाठी राज्यात विशाल मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजासाठी आजचा दिवस (27 जून) हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे. शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये मराठा आरक्षणाला हायकोर्टानं वैध ठरवलं आहे. त्यामुळे मराठा समाजासोबतच राज्य सरकारलासुद्धा मोठा दिलासा मिळाला आहे. पण आरक्षण 16 टक्क्यांऐवजी शिक्षणासाठी 12 टक्के आणि नोकरीसाठी 13 टक्के आरक्षण हवं, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.