#hdfc

#MustWatch आजचे हे टॉप 5 व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का?

व्हिडिओFeb 8, 2019

#MustWatch आजचे हे टॉप 5 व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का?

नागपुरकडे येणाऱ्या एका बसने टोल नाक्यावर दुचाकीच्या लेनमध्ये प्रवेश करत बेरिकेट तोडले आणि समोर जाणाऱ्या बाइकस्वालाला धडक दिली. सूरतमध्ये भररस्त्यावर चाकू हल्ल्याची अंगावर शहारे आणणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्लेखोरांनी तब्बल 22 ते 23 वेळा चाकूने भोसकून तरुणाची हत्या केली. चाकणमधील भरवस्तीतलं HDFC बॅंकेचं एटीएम मशीन जीपला दोरी बांधून पळवून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इस्तंबूलमध्ये 8 मजली इमारत कोसळली. या इमारतीमध्ये 43 नागरिक राहत होते. पत्त्यांसारख्या कोसळलेल्या इमारतीखाली दबून 2 जणांचा मृत्यू झाला. तर 6 दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर मुजफ्फरपूरमध्ये बँकेवर दरोडा टाकून तब्बल 35 किलो सोनं लुटून नेलं. शिवाय 2 लाखांची रोखही लंपास केली. पाहुया शुक्रवारचे सर्वाधिक चर्चेत राहिलेले हे पाच व्हिडिओ...

Live TV

News18 Lokmat
close