#haridwar

Showing of 1 - 14 from 37 results
CCTV कैद झाला गुंडांचा थरार; वकीलाची केली गोळी झाडून हत्या

व्हिडिओDec 22, 2018

CCTV कैद झाला गुंडांचा थरार; वकीलाची केली गोळी झाडून हत्या

हरिद्वार, 22 डिसेंबर : उत्तराखंडातील हरिद्वारच्या गंगनहर भागात तीन गुंडांनी एका वकिलाची दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या केली आणि तेथून फरार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुचाकीवर बसून आलेल्या वकिलाला त्यांनी भर चौकात गाठलं आणि खाली पाडलं. वकिलाने तेथून पळ काढला खरा, पण एक गुंड हातात बंदूक घेऊन त्याच्या मागे धावल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. वकिलाच्या रामनगरातील घराबाबत काही वाद सुरू होता अशी माहित असून, त्याच कारणावरून वकिलाची हत्या झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. वकिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहे.