अमरेली, 6 डिसेंबर : गुजरातच्या अमरेली भागातून जाणाऱ्या महामार्गावर एकाचवेळेस 10 सिंहाचं दर्शन आज नागरिकांना घडलं. हे दृश्य पाहून ते जागच्या जागीच स्तब्ध उभे राहीले. कळपाने आलेल्या या सिंहांनी रस्त्याच्या मधोमध ठाण मांडल्यामुळे रस्ता पार करण्याची कोणाचीच हिम्मत झाली नाही. परिणामी, या मार्गावरील वाहतूक काही वेळाकरीता खोळंबली होती. दरम्यान, क्वचितच बघायला मिळणारं हे दृश्य मोबाईल कॅमेरात कैद करण्याचा मोह नागरिकांना आवरता आली नाही.