#goa

Showing of 40 - 53 from 252 results
VIDEO: मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस जळून खाक; प्रवासी थोडक्यात बचावले

महाराष्ट्रMar 31, 2019

VIDEO: मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस जळून खाक; प्रवासी थोडक्यात बचावले

सिंधुदुर्ग, 31 मार्च : मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील ओरोस फाट्याजवळ मध्यरात्री एका लक्झरी बसने पेट घेतला. बसच्या एसीमधून अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने गाडी थांबवली. पण तोपर्यंत गाडीने पेट घेतला होता. दरम्यान, बसमधील प्रवाशांना तातडीने उतरवण्यात आलं. यात काही परदेशी प्रवासीही असल्याची माहिती आहे. 'पाउलो ट्रॅव्हल्स'ची ही बस होती. ही आग इतकी भीषण होती बस या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. यात प्रवाशांचं सामानही जळून खाक झालं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.