मुंबई, 4 जुलै: राहुल गांधी आज मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात उपस्थित आहेत. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग असल्याचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. याप्रकरणी आजची सुनावणी पूर्ण झाली असून राहुल गांधींना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.शिवडी कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे.