मुंबई, 12 सप्टेंबर: मुंबईसह राज्यभरात 10 दिवसाच्या मुक्कामानंतर बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या बाप्पांचा दहा दिवस जयघोष रंगला त्याच बाप्पांना आज पुढल्या वर्षी लवकर या अशी आर्जव भक्त करतांना दिसणार आहे. गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने सगळी यंत्रणाही सज्ज असल्याचं बघायला मिळत आहे.