मुंबई, 04 सप्टेंबर : अभिनेता सलमान खानच्या घरच्या दीड दिवसाच्या गणपतीचं मंगळवारी विसर्जन करण्यात आलं. दरवर्षी दीड दिवसांसाठी सलमानच्या घरी बाप्पाचे आगमन होत असतं. यावर्षीही अगदी उत्साहात त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. विसर्जनादरम्यान ढोल-ताशांच्या गजरात सलमाननं आपल्या बाप्पाला निरोप दिला. तर सलमानच्या घरच्या बाप्पाच्या आरतीमध्ये बॉलिवूडमधल्या अभिनेत्यांसह अभिनेत्री कतरिना कैफ ही सुद्धा उपस्थित होती. कॅटनं बाप्पाची आरतीही केली.