Ganesh Utsav

Ganesh Utsav - All Results

VIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी

व्हिडीओSep 22, 2018

VIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी

मुंबई, 22 सप्टेंबर : गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनीप्रदुषणावर आळा घालण्यासाठी हायकोर्टाने डीजे आणि डॉल्बीवर घातलेली बंदी कायम ठेवली आहे. याचा सर्वाधिक फायदा आता ढोल- ताशा पथकांना झाला आहे. काल-परवापर्यंत साधारणपणे १० ते १५ मंडळांकडून ढोल-ताशा पथकांकडे विचारणा केली जायची. मात्र, डीजेवरील बंदीमुळे एकाच दिवसात सुमारे ७० ते ८० मंडळांनी पथकांकडे विचारणा केली असल्याचे मुंबईतील 'वंदन ढोल-ताशा पथका'चे प्रमुख मिलिंद विचारे यांनी सांगितले. डीजेवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांची मागणी वाढली आहे. साधारणपणे ढोल-ताशा पथक हे ताशी वाजवण्याचे ३० ते ४० हजार रुपये घेतात. मात्र आता गणेश मंडळं त्यांना ५० ते ६० हजार रुपये देऊन स्वतःकडे येण्याचा आग्रह करीत आहेत. हायकोर्टाने डीजे-डॉल्बीवर घातलेल्या बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लॉटरीच लागली असून, आता पथकं कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading