Forecast Videos in Marathi

कोकण किनारपट्टीला क्यार वादळाचा फटका! अनेक घरांमध्ये शिरलं समुद्राचं पाणी

महाराष्ट्रOct 25, 2019

कोकण किनारपट्टीला क्यार वादळाचा फटका! अनेक घरांमध्ये शिरलं समुद्राचं पाणी

सिंधुदुर्ग, 25 ऑक्टोबर: कोकण किनारपट्टीला आज क्यार वादळाचा फटका बसला आहे . मध्यरात्रीपासून किनारपट्टीवर जोराचे वारे आणि पाऊस सुरु असून मालवण मधल्या देवबाग भागात समुद्राच्या उधाणाचं पाणी भरलं आहे . अनेक घरात पाणी घुसल्यामुळे ग्रामस्थ घाबरलेत. तर राजकोट आचरा जामडूल भागातल्या वस्तीतही समुद्राच्या उधाणाचं पाणी भरलं आहे. मच्छीमारांच्या होड्यांच नुकसान झाल असून या भागात जोराचे वारे आणि पाउस सुरु आहे .सिंधुदुर्गात गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. तर शुक्रवारी मुंबईसह उपनगरांमध्ये रिमझिम पाऊस असेल असा अंदाज वर्तवला आहे.