#electricity

मन हेलावून टाकणारी घटना; एका क्षणात 7 वर्षाचा मोनिश कोसळला

बातम्याFeb 13, 2019

मन हेलावून टाकणारी घटना; एका क्षणात 7 वर्षाचा मोनिश कोसळला

हैदराबाद, 13 फेब्रुवारी: हैदराबादमधील नरसिंग्घी परिसरातील पॅबल सिटीमध्ये 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. इमारतीच्या परिसरात खेळणारा मोनिशने खेळता खेळता एका खांबाला हात लावला. पण विजेचा प्रवाह संपूर्ण खांबामध्ये असल्याने मोनिश त्याला चिकटला. 440 व्होल्टचा करंट बसल्यामुळे मोनिशचा तेथेच मृत्यू झाला. मोनिश खांबाला चिकटला आहे हे कोणाच्याही लक्षात आले नाही. काही वेळाने तो खाली कोसळला. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. काही वेळेनंतर इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने मोनिशला पाहिले. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या इमारतीच्या देखभालीचे काम गोल्ड स्टार कंपनीकडे देण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॅबल सिटी रेसिडेंट एसोसिएशन, गोल्ड स्टार कंपनी आणि बिल्डरांच्या विरुद्ध IPC कलम 304 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close