शिवसेना-भाजप युतीचे सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण? याची चर्चा होत असताना राज्याचा विरोधी पक्ष नेता कोण यावरून आता चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची यादी पाहता विरोधी पक्ष नेता कोण याची उत्सुकता वाढली. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगतील तोच विरोधी पक्ष नेता हे नक्की आहे.