मुंबई, 31 ऑक्टोबर: अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतला समसमान वाटा या भूमिकेवर शिवसेनेने बुधवारी यु-टर्न घेतला होता. त्यांनी प्रश्न विचारला असता ही शिवसेनेची भूमिका नाही तर तुमची आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या आधीच्या विधानापासून यूटर्न घेतला. तर आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा आपलं विधान बदललंय. सत्तास्थापनेबाबत शिवसेनेची भूमिका पूर्वीचीच असल्याचं म्हणत. सगळं ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.