नांदेड, 05 नोव्हेंबर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांच्या मागण्या उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे. पीकविमा आणि मदत लवकरात लवकर मिळेल असं आश्वासनंही त्यांनी यावेळी दिलं.