Drugs Mafiya Videos in Marathi

SPECIAL REPORT : वर्दीशी गद्दारी, खाकीवाले झाले ड्रग्ज माफियाचे खबरी!

महाराष्ट्रFeb 6, 2019

SPECIAL REPORT : वर्दीशी गद्दारी, खाकीवाले झाले ड्रग्ज माफियाचे खबरी!

प्रवीण मुधोळकर,नागपूर 06 फेब्रुवारी : वर्दीशी गद्दारी करून ड्रग्ज माफियाची साथ देणाऱ्या पोलिसांचा काळा चेहरा नागपूरध्ये समोर आला आहे. खाकी वर्दी घालून ड्रग्ज माफियाला साथ देणाऱ्या चार पीएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची नामुष्की पोलीस दलावर ओढवली. अबू उर्फ फिरोज खान या ड्रग्ज माफियाच्या दरबारात पोलीस अक्षरश: हजेरी लावायचे. नागपूर पोलीस दलातले 35 अधिकारी आणि कर्मचारी अबूच्या संपर्कात होते, अशी धक्कादायक माहिती आहे. अनेक कर्मचारी पोलीस आयुक्तांच्या रडारवर आहेत. पैशासाठी ड्रग्जमाफियाशी मैत्री करणाऱ्या या बेईमान पोलिसांनी वर्दीला लावलेला कलंक पुसण्याचं आव्हान नागपूर पोलीस दलापुढे आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading