#drama

Showing of 1 - 14 from 32 results
VIDEO : 'बायको परतली नाही, तर उडी टाकेन', असं म्हणत 'तो' चक्क टॉवरव चढून बसला

व्हिडिओDec 5, 2018

VIDEO : 'बायको परतली नाही, तर उडी टाकेन', असं म्हणत 'तो' चक्क टॉवरव चढून बसला

बदायू, 5 डिसेंबर : माहेरी गेलेली पत्नी काही केल्या परतत नसल्याचं लक्षात आल्याने नाराज झालेला एका नवरोबा चक्क एका टॉवरवर चढून बसला आणि 'जर ती परतली नाही, तर वरतून उडी टाकतो', अशी धमकी देऊ लागला. माहेरी गेलेली बायको परत सासरी परतावी यासाठी उत्तर प्रदेशातील बदायूतल्या इस्लामनगरात राहणाऱ्या आरिफ नावाच्या युवकाने हा हायवोल्टेज ड्रामा केला. पती-पत्नी यांच्यात झालेल्या भांडणानंतर त्यांची बायको तिच्या बहिणीकडे रहायला गेली. दरम्यान तो तिला अनेकदा घ्यायला गेला खरा, पण ती त्याच्याबरोबर यायला तयारच झाली नाही. अखेरीस त्रासलेल्या आरिफने दारू ढोसली आणि मोबाइल टॉवरवर चढला आणि आत्महत्या करतो अशी धमकी देऊ लागला. घटनास्थळी पोलीस सुद्धा पोहोचले, पण तो खाली उतरायला तयार होईना. पत्नीसुद्धा घटनास्थळी पोहोचली. तिच्या विनंतीलासु्द्धा तो मान देईना. दारूच्या नशेत त्याने डोकंसुद्धा फोडून घेतलं. एवढंच नाही तर त्याने त्याची पँटसुद्धा काढून फेकली. जरा खाली येताच लोकांनी त्याला पकडलं आणि खाली उतरवलं. शेवटी डोकं फुटलं असल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Live TV

News18 Lokmat
close