#doni decision

धोनीच्या या पाच निर्णयांनी साऱ्यांनाच केले होतं थक्क

स्पोर्टसDec 24, 2018

धोनीच्या या पाच निर्णयांनी साऱ्यांनाच केले होतं थक्क

महेंद्रसिंग धोनी रिटायर होणार का याची कुजबुज सुरू असतानाच आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी धोनीची निवड झाली आहे. T20 आणि वन डे दोन्हीमध्ये त्याला संधी मिळणार आहे. धोनीच्या कमबॅकमुळे त्याचे चाहते खुश आहेत. या कॅप्टन कुलच्या कारकिर्दीत हे 5 निर्णय नेहमीच स्पेशल ठरले होते. वेस्ट इंडीज दौऱ्यात टी-20 मालिकेत धोनीला बाहेर बसवण्यात आलं होतं. त्याचबरोबर आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतही धोनीला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे धोनीचं क्रिकेट करिअर संपलं की काय अशी चर्चा रंगली होती. परंतु, आज सोमवारी बीसीसीआयनं या चर्चांना पूर्णविराम लगावत धोनीला भारतीय टीममध्ये पुन्हा खेळण्यासाठी संधी दिली आहे.