#dog

Showing of 27 - 40 from 101 results
VIDEO : भुकेने व्याकुळ वासराला कुत्रीने पाजले दूध!

व्हिडिओJan 10, 2019

VIDEO : भुकेने व्याकुळ वासराला कुत्रीने पाजले दूध!

वैभव, सोनवणे, पुणे, 10 जानेवारी : शिरुर शहरात एका भटक्या गाईने चाऱ्याच्या शोधात प्लास्टिक गिळले होते. त्यामुळे ही गाय जीवाच्या आकांताने ओरडत असताना एका ठिकाणी तडफडत पडली होती. आईच्या या आकांतेत गाईचं वासरू मात्र, मागेमागे फिरत होते. या सर्व परिस्थितीत वासरू भुकेनं व्याकुळ होऊन ओरडत होते. या वासराची भुकेची हाक शेवटी एका भटक्या कुत्रीच्या कानी पडली आणि भुकेनं व्याकुळ झालेल्या वासराला मातृत्वाच्या नात्याने दूध पाजले. मुक्या प्राण्यांमध्येही मातृत्वाची ममता म्हणजे काय असते, याचा आदर्श घालून देणारी ही घटना पुण्यात पाहायला मिळाली. दरम्यान, शिरुर शहरातील नागरीकांनीही या गायीवर तातडीने वैद्यकीय उपचार करून या गायीचे प्राण वाचवले. कुत्रीच्या ममतेची आणि गोमातेचे प्राण वाचवणाऱ्या तरुणाईची चर्चा सध्या शिरुरमध्ये सर्वत्र होत आहे.