मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला यंदा कोरोना काळात इतर सणांप्रमाणेच, दिवाळीही साधेपणाने करण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यात फटाक्यांच्या वापरावर बंदी आहे. महाराष्ट्रातही काही शहरात फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून (NGT) फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. फटाके विकल्यास आणि उडवल्यासही दंड भरावा लागणार आहे.