#divakar raote

VIDEO : कोण अमित शहा? सेना मंत्र्याचा सवाल

महाराष्ट्रJan 7, 2019

VIDEO : कोण अमित शहा? सेना मंत्र्याचा सवाल

कृष्णा मोहिते, कराड, 07 जानेवारी : भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीवरून शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता परिवहन मंत्री आणि सेनेचे नेते दिवाकर रावतेंनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, 'कोण अमित शहा?', असं बोलून भाजपसोबतचे दुरावलेले संबंध उघड केले आहे. कराड येथे एका कार्यक्रमाला ते आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये स्वबळाचा नारा दिला, यावर सेनेची काय भूमिका असा सवाल पत्रकारांनी विचारला असता, "आम्ही आधीच स्वबळाचा नारा दिला आहे, यात नवीन काही नाही", असंही रावते यावेळी म्हणाले आहे. राज्यात युती झाली तर ठिक, नाहीतर विरोधियोंको 'पटक' देंगे असा इशारा अमित शहा यांनी काल लातूर येथील भाजप मेळाव्यात दिला होता. शहांच्या या इशाऱ्यानंतर सेना नेते आक्रमक झाले आहे.

Live TV

News18 Lokmat
close