#diesel

VIDEO : फुकट तिथे चिकट, उलटलेल्या टँकरमधून लोकांनी हंडे भरून डिझेल पळवलं!

देशJul 24, 2019

VIDEO : फुकट तिथे चिकट, उलटलेल्या टँकरमधून लोकांनी हंडे भरून डिझेल पळवलं!

प्रशांत लिला रामदास, सोनभद्र, 24 जुलै : उत्तर प्रदेशमधील सोनभद्रमध्ये डिझेल टँकर अनियंत्रित झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, त्यानंतर फुकट्यांनी टँकरवर चांगलाच हात साफ केला. लोकांनी डिझेल लुटण्यासाठी एकच गर्दी केली. हंडे, पातले, कॅन मिळेल त्या साहित्यातून गावकऱ्यांनी डिझेल चोरून नेलं. एवढंच नाहीतर पोलिसांनी गाडीत डिझेल भरून घेतलं.