देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) किमती सातत्यानं वाढत आहेत. देशातील अनेक राज्यात पेट्रोलच्या दरांनी शतक गाठलं आहे. इतकंच नाही तर राज्यातही अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल शंभरीच्या जवळपास असल्याचं चित्र आहे. अशात परिस्थिती सामान्य नागरिकांना मोठा फटका बसत असून पेट्रोल डिझेलचे दर इतके का वाढले, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.