दीपक बोरसे (प्रतिनिधी) धुळे, 16 ऑक्टोबर: काँग्रेसनं नेहमीच देशविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. धुळ्यात महायुतीच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचारात इराणी बोलत होत्या. काँग्रेस देश तोडण्याचं काम करते तर मोदी यांनी देश जोडण्याचं काम केलं आहे असं म्हणत पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. स्मृती इराणींनी मराठीत बोलून उपस्थितांची मनही जिंकली.