#dhule

Showing of 53 - 66 from 169 results
VIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी

व्हिडिओNov 11, 2018

VIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी

धुळे, 10 नोव्हेंबर : धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे भाजपतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या महापालिका निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर भाजपतर्फे धुऴ्यात विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. पण भाजप आमदार अनिल गोटेंना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. तरी अनिल गोटे स्वतःच कार्यक्रमस्थळी आले. आणि रावसाहेब दानवेंच्या भाषणावेळीच गोटे मध्येच उठून बोलण्याचा प्रयत्न करू लागले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी त्यांना बोलण्यापासून रोखलं. तर गोटे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि गोंधळ घातला. सरतेशेवटी पोलिसांनी आमदार गोटे यांना व्यासपीठाबाहेर नेलं. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गोटेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली तर दानवेंनी गोटेंना खुलं आव्हान दिलंय. यावरूनच भाजपमधला धुळ्यातला अंतर्गत वाद समोर आलाय.