#devendra fadnavis

Showing of 1 - 14 from 242 results
BREAKING NEWS VIDEO : सेना-भाजप युती जवळपास निश्चित

व्हिडिओFeb 16, 2019

BREAKING NEWS VIDEO : सेना-भाजप युती जवळपास निश्चित

मुंबई, 16 फेब्रुवारी : शिवसेना आणि भाजपची अखेर युती झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाला अंतीम स्वरूप देण्यात आलंय. ही युती शिवसेनेच्या अटी आणि शर्थींवर करण्यात आलीय. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदारसंघ सोडण्यात आलांय. त्यामुळे शिवसेना लोकसभेत २३ जागांवर निवडणुक लढवणार आहे. तर विधानसभा निवडणुकीत 50-50 फॉर्म्युलावर युती झाली असल्याचं सुत्रांनी सांगितलं. ही युती फक्तं शिवसेना आणि भाजप या दोन मित्र पक्षांचीच असेल. भाजपच्या मित्र पक्षांशी शिवसेनेची युती नसेल. भाजपच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात शिवसेना उमेदवार उभा करणार आहे. त्यामुळे शिवसेनेला विधानसभेत 160 पर्यंत उमेदवार उभे करता येणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं. एकुणच काय तर शिवसेनेला महाराष्ट्रात मोठ्या भावाची भूमिका अखेर मिळाली आहे.

Live TV

News18 Lokmat
close