#devendra fadnavis

Showing of 79 - 92 from 649 results
VIDEO : स्नेहभोजनात मुख्यमंत्र्यांनी दिला घटकपक्षांना नवा आदेश

व्हिडिओFeb 25, 2019

VIDEO : स्नेहभोजनात मुख्यमंत्र्यांनी दिला घटकपक्षांना नवा आदेश

25 फेब्रुवारी : भाजप आणि शिवसेना युती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिनर डिप्लोमेसी केली. वर्षा बंगल्यावर सेना-भाजपच्या नेत्यांसह घटकपक्षांनी आमंत्रित करण्यात आलं होतं. या स्नेहभोजनावेळी मुख्यमंत्र्यांनी मित्र पक्षांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. 'मागच्या वेळी जिंकलेल्या जागांपेक्षा जास्त जागा आपण जिंकू' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. 'लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 100 टक्के युतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी त्यांनी बोलून दाखवला. नाराज मित्रपक्षांना स्नेहभोजनला सोबत घेत यावेळी भाजप आणि शिवसेनेनं दिलजमाईचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीतील स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे, महादेव जानकर, रामदास आठवले, विनायक मेटेही हजर होते.

Live TV

News18 Lokmat
close