#death

Showing of 40 - 53 from 489 results
VIDEO : मासे पकडण्यासाठी लावले होते जाळे, 18 पक्षांचा अडकून दुर्दैवी मृत्यू

व्हिडिओJan 24, 2019

VIDEO : मासे पकडण्यासाठी लावले होते जाळे, 18 पक्षांचा अडकून दुर्दैवी मृत्यू

मनमाड, 24 जानेवारी : महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यमध्ये मंगळवारी सायंकाळी बेकायदेशीर मासेमारीकरिता टाकलेल्या जाळ्यात सुमारे 17 ते 18 पक्षी अडकून मृत झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नांदूर मधमेश्वरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर भगवान ठाकरे आणि अधिकारी अशोक काळे यांनी घटनास्थळी जाऊन मासेमारीची जाळी बाहेर काढली. त्यात अडकून मृत पावलेल्या पक्षांचा पंचनामा करण्यात आला असून, मासेमारी करणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर धरण क्षेत्रामध्ये हे पक्षी अभयारण्य येत असल्याने या ठिकाणी मासेमारी करण्यास परवानगी नाही. तरीसुद्धा अनाधिकृतपणे मासेमारी केली जात असल्याचं यानिमित्तानं उघड झालंय.

Live TV

News18 Lokmat
close