इंटरनेटवर सध्या एका 3 वर्षाच्या मुलीचा व्हिडीओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. या तीन वर्षांच्या चिमुरडीचा व्हिडीओ अनेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या टाईमलाईनवर शेअर केला आहे. यामध्ये ही कलाकार मुलगी आपल्या वडिलांबरोबर एकाच व्यासपीठावर गाणं गात आहे. तिचा आवाज इतका गोड आहे की ट्विटर, फेसबुकवर याच चिमुरडीच्या व्हिडीओची चर्चा आहे.