#danve

Showing of 40 - 53 from 165 results
VIDEO : 'जालना का खासदार कैसा हो, अर्जुन खोतकर जैसा हो' शिवसैनिकांचा ठिय्या

व्हिडिओMar 12, 2019

VIDEO : 'जालना का खासदार कैसा हो, अर्जुन खोतकर जैसा हो' शिवसैनिकांचा ठिय्या

विजय कमळे-पाटील, 12 मार्च : जालना लोकसभा मतदार संघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादाचा तिढा कायम आहे. जालन्याची जागा भाजपला न सोडता या जागेवर अर्जुन खोतकरांनीच लोकसभा लढवावी यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. यासाठी आज शिवसैनिकांनी अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं. खोतकरांनी लोकसभा लढावी यासाठी आम्ही 2 वर्षांपासून कामाला लागलोय. मात्र, आता जर खोतकरांनी जालन्यातून लोकसभा लढवली नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू असा इशाराच शिवसैनिकांनी दिली. यावेळी रावसाहेब दानवेंविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, जालन्यातील खोतकर विरूद्ध दानवे वाद सर्वश्रुत आहे. त्यात युतीची घोषणा झाल्यानंतर खोतकरांनी दानवेंना जालन्यातून उमेदवारी देण्यावरून वारंवार नाराजी व्यक्त केली.

Live TV

News18 Lokmat
close