03 ऑगस्ट : आज झालेल्या सांगली आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने मोठा हात मारला आहे. तब्बल 35 वर्षांनंतर भाजपाने दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे. सध्या सांगली आणि जळगावमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे. यात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनीही कार्यकर्त्यांसोबत विजय साजरा केला आहे. भाजपने 75 पैकी 57 जागावंर विजय मिळवला आहे तर सांगलीमध्ये 78 जागांपैकी भाजपने 36 जागांवर विजय मिळवला आहे. या विजयाचा जल्लोष साजरा करताना गिरीष महाजन यांनीही कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला आहे.