Dams Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 59 results
VIDEO : आता पेंच धरणाच्या कालव्याला पडलं भगदाड; कोट्यवधी लिटर पाणी वाया!

व्हिडीओOct 1, 2018

VIDEO : आता पेंच धरणाच्या कालव्याला पडलं भगदाड; कोट्यवधी लिटर पाणी वाया!

नागपूर, 1 ऑक्टोबर - जिल्ह्यातील पेंच धरणाचा डावा कालवा सोमवारी सकाळी फुटल्याने कोट्यवधी लिटर पाणी वाया गेलं. कालवा फुटल्याची माहिती शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाच्या अभियंत्यांना दिली. पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र तुरखेडे यांनी कालवा फुटल्याचं मान्य केलेय. प्रकल्पापासून 8 कि.मी. अंतरावर पारशिवनी तालुक्यातील माहुली येथे कालव्याला भगदाड पडलं असून, त्यातून कोट्यवधी लिटर पाणी वाया जात आहे. अधिकारी आणि कर्मचारी कालव्याची दुरुस्ती साठी घटनास्थळावर पोहोचले असून, धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात आले आहे. भगदाड पडलेल्या जागेतून वाहणारे पाणी प्रचंड वेगाने बाहेर जात आहे. पारशिवनी, मौदा आणि रामटेक या तालुक्यातील धान उत्पादकांना सिंचनासाठी प्रकल्पातील पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा कालवा फुटल्याने या भागातील धान शेती पाण्याखाली गेलीय. पुण्यात गुरुवारी कालवा फुटीची घटना घडली. उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी भरावाची माती पोखरली असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. आता पेंच कालव्याला पडलेल्या भगदडासंर्दभात ते काय विधान करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading