#dams

Showing of 27 - 40 from 142 results
VIDEO : मुळा धरणातून पाणी निघालं तहानलेल्या 'जायकवाडी'कडे

महाराष्ट्रNov 1, 2018

VIDEO : मुळा धरणातून पाणी निघालं तहानलेल्या 'जायकवाडी'कडे

अहमदनगर,1 नोव्हेंबर : आज सकाळी मुळा धरणातून मराठवाड्याला पाणी सोडलं आहे. 4 हजार क्यूसेक वेगानं जायकवाडी धरणात पाणी सोडलं गेलं. दुपारपर्यंत एकूण 10 हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्याला नगर-नाशिकचं पाणी सोडण्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर आज सकाळी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाणी कुणाची खासगी मालमत्ता नसल्याचे खडेबोल कोर्टाने सुनावले आहेत.