पुणे, 26 जून: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आला आहे. शरद कळसकर आणि सचिन अंदुरेने या दोघांनीच नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआयने न्यायालयात दिली आहे. याबाबतचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले. पुण्यातील विशेष कोर्टात सीबीआयने एक अहवाल सादर केला. या अहवालात कळसकर आणि अंदुरे या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचे म्हटले. दाभोलकर हत्या प्रकरणातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा असल्याचे मानलं जातं.