चिपळूण, 07 जून : चिपळूणमध्ये आज एका घराशेजारी चक्क साडे सहा फुटांची मगर आढळली. यामुळे कामथे गावात प्रचंड घबराट पसरली होती. कामथे इथं असलेल्या धरणातील पाणीसाठा कमी झाला असल्यामुळे ही मगर भक्ष्याच्या शोधात वस्तीमध्ये शिरली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीला पकडून पुन्हा नदीपात्रात सोडलं.